– अभियंत्याची पत्नी, दोन मुली व गावंडीच्या भावाने सुटकेची केली होती विनंती
The गडविश्व
बिजापूर : १० फेब्रुवारी रोजी नक्षल्यांनी बेद्रे भागात इंद्रावती नदी पुलाच्या बांधकामावरील अभियंता आणि गवंडीचे अपहरण केले होते. 4 दिवस लोटूनही त्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता अखेर आज १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नक्षल्यांनी अभियंता आणि गवंडीची सुखरूप सुटका केली आहे.
बेद्रे भागातील इंद्रवती नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या कामावरील अभियंता आणि गवंडीची नक्षल्यांनी अपहरण केले होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अभियंताची पत्नी आपल्या दोन मुलीसह आपले पती व गवंडीचा भाऊ यांनी आपल्या भावाची सुटका करण्यात यावी अशी विनवणी केली होती. अखेर आज अभियंता अशोक पवार व गवंडी आनंद यादव यांची नक्षल्यांनी सुखरूप सुटका केल्याचे कळते.