The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्रनातर्गत येत असलेल्या मवेली ते मोहूर्ली रस्ता बांधकामावरील वाहनांची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने नक्षली पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे.
एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्रनातर्गत येत असलेल्या मवेली ते मोहूर्ली रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. काल रात्रोच्या सुमारास नक्षल्यांनी रस्ता कामावरील दोन पोकलेन मशीन, ट्रॅक्टर ग्रेडर, ट्रक ची जाळपोळ केल्याची माहिती आहे. या जाळपोळीत कंत्राटदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीच नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील एका इसमाची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती आता पुन्हा नक्षल्यांनी वाहनांची जाळपोळ केल्याची घटना समोर आल्याने परिसरात नक्षली सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.