नक्षल्यांनी केली वाहनांची जाळपोळ

2748

– पोकलेनसह कल्व्हर्ट बांधणीत गुंतलेले शिफ्टरची केली जाळपोळ

The गडविश्व
सुकमा, ८ ऑगस्त : जिल्ह्यातील किस्ताराम पोलीस स्टेशन हद्दीतील सिंदूरगुडा भागात कल्व्हर्ट दुरुस्तीच्या कामासाठी असलेल्या वाहनांची जाळपोळ केली आहे. जाळपोळ करण्यात आलेल्या वाहनामध्ये पोकलेन आणि शिफ्टर मशीनचा समावेश आहे. सदर घटनेला सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी दुजोरा दिला आहे.
किस्ताराम पोलीस स्टेशन हद्दीतील सिंदूरगुडा भागात कल्व्हर्ट दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान नक्षल्यांनी घटनास्थळ गाठून पोकलेन आणि शिफ्टर मशीनला आग लावून दिली. या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता बांधकाम सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यात ठेकेकदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here