– रात्रोच्या सुमारास घरातून जंगल परिसरात नेऊन केली हत्या
The गडविश्व
बिजापूर : छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी डोके वर काढत पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातून सरपंचाची हत्या केल्याची घटना बिजापूर जिल्ह्यातील तोयनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उघडकीस आली आहे. रतिराम कुडियाम असे हत्या करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव असून ते मोरमेड गावचे सरपंच होते.
मंगळवार २८ जून रोजी रात्रोच्या सुमारास बिजापूर जिल्ह्यातील मोरमेड गावचे सरपंच रतिराम कुडियाम हे घरी झोपले असताना काही सशस्त्र नक्षली गेले व झोपेतून उठवून आपल्यासोबत जंगलात घेऊन गेले व धारदार शस्त्राने त्यांची हत्या करून मृतदेह गावाजवळच फेकून दिला.
पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी ही घटना घडवून आणली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.