नक्षल्यांनी केली हवालदाराची धारदार शस्त्राने हत्या

586

– ग्रामीण वेशभूषेत ५ ते ६ च्या संख्येत नक्षल्यांनी बाजार परिसरात केली हत्या 
The गडविश्व
बिजापूर : नक्षल्यांनी एका सहाय्यक हवालदाराची आठवडी बाजारात धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना १० एप्रिल रोजी बिजापूर जिल्ह्यातील मीरतूर इथे घडली.
सदर घटनास्थळ हे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याचे कळते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल कळती (३५) असे हत्या करण्यात आलेल्या सहाय्यक हवालदाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गोपाल कडती हे ड्युटी करून पोलीस ठाण्यात आले व घरी जेवण करण्याकरिता गेले. दरम्यान घरून पोलीस ठाण्यात येत असतांना ग्रामीण वेशभूषेत असलेल्या नक्षल्यांनी गोपाल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. मिरपूर येथील आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेत नक्षली पसार झाले. सदर घटनास्थळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून भरदिवसा सदर घटना घडल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here