– इतर तीन मंत्री नॉट रिचेबल, मोठा राजकीय भूकंपाचे संकेत
The गडविश्व
मुंबई : शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे हे समर्थक 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यामुळे शिवसेना फुटली असल्याची चर्चा रंगली असून सरकार धोक्यात आले आहे. त्यानंतर अनेक सेनेचे आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. एवढंच नाहीतर अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे हे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे राज्यातील काही आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकूण चार मंत्री नॉट रिचेबल आहे. एवढेच नाहीतर अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.
गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचे समोर आले आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचेही समोर आले आहे.
विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचं संख्याबळ हे १३४ झाले आहे. त्यामुळे भाजप आता अविश्वास ठराव मांडले अशी चर्चा रंगली आहे. पण, त्यासाठी भाजपला आणखी संख्या जुळवावी लागणार आहे. पण, आता एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.