tigआजपर्यंत भंडारा, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा सी.टी.१ वाघ कित्येकजणांचे बळी घेऊन वनविभागाला हुलकावणी देत आहे. त्याला पकडण्यासाठी शार्पशुटरची चमु दाखल झालेली असुन जंगलात झूडुपे वाढलेली होती व भरपूर पाऊस सुरू होता त्यामुळे वाघाला पकडण्यासाठी शार्पशुटरला अडचणी येत असत आणि आता जंगलातील वाटा सुकलेल्या असल्याने लवकरच वाघाला जेरबंद करण्यात येईल अशी ग्वाही वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी आज “The गडविश्व” सोबत बोलतांना दिली.
आरमोरी तालुक्यात काल-परवा सलग दोन दिवसात दोघांचा बळी वाघाने घेतला असून परिसरात दहशत पसरली आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून वाघाला जेरबंद करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत आहे. वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले की, वाघाला जेरबंद करण्याकरिता शार्पशुटरची चमु दाखल झालेली असुन जंगलात झूडुपे वाढलेली होती व भरपूर पाऊस सुरू होता त्यामुळे वाघाला जेरबंद करण्याकरिता शार्पशुटरला अडचणी येत होती. मात्र आता जंगलातील वाटा सुकलेल्या असल्याने लवकरच वाघाला जेरबंद करण्यात येईल, पुन्हा अशाप्रकारे घटना घडू नये याकरिता नागरिकांनी पहाटे व सायंकाळी चार च्या नंतर जंगलात जाऊ नये व दिवसा जंगलात जातांना वनविभागाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.