नागपुरात सुरू झाले दृष्टीहीन लोकांसाठी देशातील पहिले रेडिओ केंद्र

542

The गडविश्व
नागपूर : येथे दृष्टीहीन लोकांसाठी देशातील पहिले रेडिओ केंद्र सुरु करण्यात आले आहे. ‘रेडिओ अक्ष’ असे या रेडिओ चॅनेल चे नाव आहे. या रेडिओ केंद्रासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आणि सामग्री ह्या दृष्टीहीन व्यक्तींकडून तयार करण्यात येतील असे रेडिओ केंद्राचे समन्वयक आणि समदृष्टी क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळाचे सदस्य शिरिष दारव्हेकर यांनी सांगितले आहे. तसेच दृष्टीहीन व्यक्तींना त्यांच्या घरून सहज शिकता यावे यासाठी आम्ही ऑडिओबुक देखील विकसित करत असल्याचेहि त्यांनी सांगितले.
दरम्यान हा देशातील दृष्टीहीन लोकांसाठी विकसित केलेले पहिलेच रेडिओ केंद्र असून यामुळे अंध व्यंक्तींच्या विकासासाठी मदत होणार आहे. असे रेडिओ केंद्राच्या समन्वयकांनी सांगितले आहे. रेडिओ केंद्रासाठी लागणारे कर्मचारी हे पूर्णपणे प्रशिक्षित असून त्यामध्ये जास्त महिलांचा सामावेश आहे. त्यासाठी लागणारा कंटेंट त्या तयार करणार आहेत. मागच्या काही वर्षापासून आम्ही दृष्टीहीनांसाठी ऑडिओबुक तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत पण कोरोनामुळे ते काम पुढे ढकलण्यात आले असे ते ANI ला बोलताना म्हणाले.
रेडिओच्या AM आणि FM साठी काही मर्यादा आहेत. आमच्या या वाहिनीसाठी आम्हाला वेगळा कंटेंट द्यावा लागणार आहे. त्यासाठी आमची २० लोकांची टीम काम केली आहे. आमच्या टीममध्ये जास्त महिला असून त्या हाऊसवाईफ असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच हे चॅनेल Play Store वरही उपलब्ध असणार आहे, तसेच Apple Device वरही आपल्याला या वाहिनीवरील कार्यक्रम ऐकता येऊ शकतात. आम्ही फक्त २ ते ४ दिवसांत १६१ श्रोते तयार केले आहेत असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here