नारायण जराते यांचे दुःखद निधन : पुलखल येथे होणार अंत्यसंस्कार

386

The गडविश्व
गडचिरोली : नजिकच्या पुलखल येथील नारायण कवळू जराते (५० ) यांचे आज रात्री ८.३० वाजता दरम्यान ब्रम्हपुरी येथील आस्था हास्पीस्टल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने जराते परिवारावर दु:खाचे सावट कोसळले असून पुलखल येथील वैनगंगा नदीघाटावर सकाळी ११.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांचे ते काका होते.गावात अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेल्या नारायण जराते यांची अचानक तब्बेत बिघडल्याने त्यांना ब्रम्हपुरी येथील आस्था क्रीटीकल केअर हॉस्पिटल मध्ये चार दिवसांपूर्वी भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा, मुलगा महेंद्र, मुलगी अश्वीनी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here