The गडविश्व
एटापल्ली, ५ ऑगस्ट : तालुक्यातील कांदोळी येथील निराधार महिलेला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ८ महिन्याचा कालावधी लोटूनही लाभ मिळाला नाही. हि बाब राजमुद्रा फाउंडेशनल कळताच त्या निराधार महिलेची सदस्यांची लागलीच भेट घेऊन समस्या जाणून घेतली व मदत केली.
एटापल्ली तालुक्यातील कांदोळी येथील मोलीना दिलीप प्रमाणिक या महिलेने संजय गांधी निराधार योजना अंतर्गत अर्ज दाखल केले मात्र ८ महिन्याचा कालावधी लोटूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. हि बाब राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत मामीडवार, उपाध्यक्ष मनीष ढाली,अमित सोनी, बिप्लव बिश्वास यांना कळताच सदस्यांची लागलीच भेट घेऊन समस्या जाणून घेतली तहसील कार्यालयात जाऊन संबधीत अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा केली असता येत्या १५ दिवसात खात्यात पैसे जमा होईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.