The गडविश्व
नवी दिल्ली : छत्तीसगडचे निलंबित आयपीएस अधिकारी जीपी सिंह यांना ईओडब्लू दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. अवैध संपत्ती आढळून आल्याने ईओडब्लू यांनी जीपी सिंह यांच्या घरी छापा मारला होता. छापेमारी दरम्यान जीपी सिंह यांच्या घरी व अन्य ठिकाणी उत्पन्नापेक्षा अवैध संपत्ती आढळून आल्याने एफआयआर दाखल करण्यात आली होती. दरम्यान निलंबित आईपीएस अधिकारी जीपी सिंह यांच्या 15 पेक्षा अधिक ठिकाणांवरून 6 महीने आधाी जुलै महिण्यात एसीबी आणि ईओडब्ल्यू यांनी छापेमारी करून कारवाई केली होती. यावेळी जीपी सिंह यांच्या घरी व अन्य ठिकांनावरून अवैध संपत्ती व काही दस्ताऐवज आढळून आले होते.
मिळालेल्या दस्ताऐवजावरून जीपी सिंह यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जीपी सिंह 1994 च्या बॅच चे आईपीएस अधिकारी आहेत. ते दुर्ग विभागाचे आइजी राहिलेले आहेत व भ्रष्टाचार विरोधी शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा चे प्रमुख होते. सरकार ने भ्रष्टाचाराचा गुन्हा सामोर येताच त्यांना निलंबित केले होते. यावेळी आईपीएस अधिकारी जीपी सिंह यांनी अटक व कारवाई थांबविण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचीका दाखल केली होती. परंतु या महीन्यात सुप्रीम कोर्टाने जीपी सिंह यांच्या याचिकेवर सुनावनी करण्यास नकार दिला. यानंतर जीपी सिंह यांच्या जवळ आत्मसमर्पण करण्याव्यतीरिक्त दुसरा पर्याय नव्हता. कोर्टाच्या निर्णयानंतर रायपूर पोलीस, एसीबी आणि ईओउब्ल्यू यांनी जीपी सिंह यांना अटक करण्याची तयारी केली होती. काही दिवसांअगोदरच जीपी सिंह हे दिल्ली मध्ये असल्याची माहिती मिळाल्याने ईओडब्ल्यू ने त्यांना पकडण्यास पथक पाठवून अटक केली.