निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेश, सुलभ आणि सहभागी बनविण्यावर भर

329

– 12 व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्या मुख्यालयी आयोजन

The गडविश्व
गडचिरोली : निवडणूका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी बनवणे (Making Election inclusive, Accessible and Participative) अशी बाराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम निश्चीत करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांना मतदानाबाबत शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढावा व त्यांच्यात मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात येणार आहे. कोविड संसर्ग असल्याकारणाने सदर कार्यक्रम मर्यादीत उपस्थितांपुरताच आयोजित केला आहे.
दिनांक 25 जोनवारी हा भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस असुन यावर्षी 25 जानेवारी, 2022 ला 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अनुषंगाने मतदार नोंदणी व निवडणूकीची उत्कृष्ठ कामे करणा-या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे.

जिल्हयात 8.01 लक्ष मतदार : गडचिरोली जिल्हयात 801146 एकुण मतदार आहेत. यामध्ये एकुण 405505 पुरूष, 395635 महिला तर 6 तृतीयपंथी आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकुण 259804 मतदार असून पुरूष 130566, महिला 129237 व 1 तृतीयपंथी आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकुण 296343 मतदार असून पुरूष 151153, महिला 145189 व 1 तृतीयपंथी आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात एकुण 244999 मतदार असून पुरूष 123786, महिला 121209 व 4 तृतीयपंथी आहेत. पहिल्यांदाच मतदान करणारे नवमतदार वय वर्ष 18 व 19 मधील 9996 आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here