– जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन
The गडविश्व
भामरागड : भामरागड पारंपरिक इलाका गोटुल समिती व आदिवासी विध्यार्थी युवा संघटना तर्फे मौजा नेलगुंडा येथे भूमकल आंदोलनाचे महानायक शाहिद गुंडाधुर दुर्वे यांच्या 112 व्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन १० फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.
यावेळी नेलगुंडा येथील गोटूल भूमी मध्ये कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आदिवासी समाजाचा सप्तरंगी झेंडा पडकवून, आदिवासी समाजाचे महापुरुषांचे फोटोला दीप प्रज्वलित व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अँड.लालसु नोगोटी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भामरागड पं.स.सभापती सौ.गोईताई कोडापे, जि.प.सदस्य ज्ञानकुमारी कोशी, उपसभापती सुखराम मडावी, लक्ष्मीकांत बोगामी, महेश वरसे होते. तसेच यावेळी पेरमिलीचे उपसरपंच सुनील सोयाम, शामराव येरकलवार, श्रीकांत बंडामवार आदि होते.
यावेळी कार्यक्रमात भूमकल आंदोलनाचे महानायक शाहिद गुंडाधुर दुर्वे यांच्या आंदोलन बदल माहिती देण्यात आली व भारत देशामध्ये इंग्रज सरकार विरुद्ध आंदोलन केलेले सर्व आदिवासी समाजातील महापुरुषांचे इतिहासावर करण्यात आले तसेच आदिवासी संस्कृती, रीती रिवाज, प्रता परंपरा टिकवून ठेवणे, आदिवासी समाजाचा पारंपरिक व संवैधानिक हक्क अधिकार मिळण्यासाठी म्हणून आपण संपूर्ण आदिवासी समाज एकत्र राहून, संघर्ष केला पाहीजे. तरच आपला आदिवासी समाज पुढे जाऊ शकतो असे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भामरागड इलाका पट्टीतील आदिवासी समाजातील कर्मचारी वर्ग, पट्टीतील सर्व गाव – भुमिया, गायता, पेरमा सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.