– ४२ उमेदवारांची प्राथमिक निवड
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आलापल्ली च्या संयुक्त विद्यमाने 25 मे 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आलापल्ली(नागेपल्ली) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आलेले होते. सदर रोजगार मेळाव्यामध्ये 60 उमेदवारांनी महिंद्रा ॲन्ड महिंद्रा,पुणे या कंपनीला अर्ज दाखल केले.त्यापैकी 42 उमेदवारांची प्राथमिक निवड झालेली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकमध्ये गणेश चिमणकर, कौशल्य विकास अधिकारी यांनी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली या कार्यालयातील सर्व योजनांची तसेच विभागाच्या वेबपोर्टल याची माहिती उपस्थित उमेदवारांना दिली.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक,ए.एस.पवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयातील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती कार्यक्रम या योजनांची माहिती दिली.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बोंगिरवार,गटनिर्देशक भांडारकर व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आणि महिंद्रा ॲन्ड महिंद्रा,पुणे या कंपनीचे प्रतिनिधी हे रोजगार मेळाव्यास उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली,यांनी रोजगार मेळाव्याचे घेण्याचे उददेश काय असते हे सांगितले,उपस्थित उमेदवारांना रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे सांगून पुढील वाटचालीसाठी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.भाग्यश्री येरावार,तर उपस्थित मान्यवरांचे श्री.माहूरकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. हा रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली कार्यालयातील अधिकारी/कर्मचा-यांनी सहकार्य केले.