– राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने ८० प्रकरणे मंजूर
The गडविश्व
अहेरी : तहसील कार्यालया कडून तालुक्यातील राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत ८० प्रकरणे मंजूर करण्यात आले असुन काल जिमलगटा येथील मंडळ कार्यालयात सदर योजने अंतर्गत पात्र लाभार्थीना धनादेश वाटप कार्यक्रम घेण्यात आले. अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते जिम्मलगटा साजा अंतर्गत येणाऱ्या गावातील लाभार्थाना धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी.खोत, मंडळ अधिकारी सिडाम, तलाठी मडावी व ग्रामसेवक सिडाम व कोतवाल व लाभार्थी उपस्थित होते.