THE गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील पकनाभट्टी येथे एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकच्या माध्यमातून १२ रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला.
गावातील व्यसनी रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने पकनाभट्टी वासियांच्या मागणीनुसार एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकला १२ रुग्णांनी भेट देत पूर्ण उपचार घेतला. सोबतच रुग्णांना समुपदेश करीत औषधोपचार करण्यात आले. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत प्राजु गायकवाड यांनी रुग्णांना समुपदेशन केले. संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. क्लिनिकचे नियोजन मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके यांनी केले. क्लिनिकच्या यशस्वीतेसाठी गाव संघटन सदस्य लालाजी तोफा, पोलीस पाटील रामनाथ कोरचा, मुख्याध्यापक ओ.सी.ठलाल, अंगणवाडी सेविका काटेंगे यांनी सहकार्य केले.