पद्म पुरस्कार 2022 जाहीर

234

The गडविश्व
नवी दिल्ली : पद्म पुरस्कार – देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार , विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इत्यादी विविध शाखांमधील / क्षेत्रातील योगदानासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार प्रदान केला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा केली जाते.
दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिलच्या आसपास हे पुरस्कार राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे प्रदान केले जातात.या वर्षी राष्ट्रपतींनी खाली दिलेल्या यादीनुसार एक पुरस्कार दोन जणांना विभागून देण्यासह 128 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे (दोन जणांना विभागून दिलेला पुरस्कार एकच मोजला जातो).या यादीत 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.पुरस्कार विजेत्यांपैकी 34 महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी/अनिवासी भारतीय /भारतीय वंशाची व्यक्ती/भारतीय परदेशी नागरिकत्व या श्रेणीतील 10 व्यक्ती आणि 13 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.

पद्म पुरस्कार विजेत्यांची तपशीलवार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here