– ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
The गडविश्व
गडचिरोली : स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा अंतर्गत जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन सामाजिक वनिकरण विभाग, परिक्षेत्र गडचिरोली मार्फत ५ जुन २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका, चांदाळा रोड गडचिरोली येथे वृक्षारोपन, आरोग्य तपासणी व रकतदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये एकुण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर कार्याक्रमा अंतर्गत रोपवाटीका परिसरात फळ झाडांची लागवड करून कार्याक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील वैद्यकिय चमुकडून ८०-९० लोकांची आरोग्य तपासणी करून रक्तदान शिबीरास सुरूवात करण्यात आली. या मध्ये एकुण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यात भोजराज गुरनुले, जनार्धन तुनकलवार, मारोती येलकुचेवार, राहूल कापकर, सतिश कारडे, विकास मडावी, विवेक अलोने, अक्षय मेश्राम, अक्षय मांढरे, राकेश सिकदर, अजितसिंग राठोड, राकेश उडाण, दुर्योधन कुकडे, मृत्युजंय विस्वास, नित्यांनंद दास, प्रमोद तोडासे, वासुदेव कडयामी, सुमित बर्डे, विनोद नेचलवार, गणेश आखाडे, लोमेश तुंकलवार, खेमाजी नन्नावरे, महेश भांडेकर, लुकेश कुकडकर, दुर्योधन चापले, आदित्य लटारे, योगराज कोल्हे, निलेश धोडरे, महेद्र लटारे, निलकंठ वासेकर, कमलेश भगत, तुषार पिपरे, देवेद्र धुर्वे, ज्ञानेश्वर गावडे, धिरज ढेबरे, विपूल नैताम, चंद्रशेखर दुगा, महेश तडामी, प्रकाश पिपरे, सुशिल पिपरे, भुषन भुरसे, नरेद्र सोनी, योगेश तुलावी दुर्वाकुर निकोडे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली तसेच सर्वानी रक्तदान केल्यामुळे रक्तपेढीमध्ये वाढ होवून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा होण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाला करीता सोनल भडके, सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली, बिलोलीकर, विभागीय वन अधिकारी, गडचिरोली, धिरज ढेंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली, वासेकर वनपाल, बोगा, देगावे, वनपाल विद्या उईके, वनपाल, अलोने, वनरक्षक, नितेश सोमलकर, लिपीक तसेच कार्यालयीन कर्मचारी व कर्मचारी उपस्थिती होती.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरीता रक्तपेढी गडचिरोली येथील डॉ. साखरे, BTO, मोहिणी कुटे, Tec., समता खोब्रागडे, सिस्टर, जिवन गेडाम,निराशा राऊत, बालपांडे, कविता वैद्य, श्रीकांत मोडक यांनी सहकार्य केले. या रक्तदान शिबीर करीता विषेश सहकार्य APEM टिम, गडचिरोली व स्वयं रक्तदाता जिल्हा समिती चे सचिव मनोज पिपरे यांनी केले.