पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार

552

The गडविश्व
मुंबई, १२ जुलै : पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी २ सप्टेंबर २०२१ रोजी ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदासाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत ३९०२ पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी रिक्त जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा उपलब्ध नव्हत्या अशा सुमारे १९६ व्यवस्थापनांतील सुमारे ७६९ रिक्त पदांसाठी आता एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्ल्युएस / खुल्या प्रवर्गात रूपांतरीत करण्यात आलेल्या आहेत. या सुमारे ७६९ रिक्त पदांसाठी स्वप्रमाणपत्र अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी १७ जुलै २०२२ पर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येईल. त्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल.
या १९६ व्यवस्थापनाच्या सुमारे ७६९ रिक्त पदांसाठी १:१० या मर्यादेत (उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार व्यवस्थापनांना उपलब्ध करुन दिले जातील. उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड या ३० गुणांच्या आधारे व्यवस्थापनांकडून आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल, असे शिक्षण उपसंचालक (प्रशासन) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here