– मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय
The गडविश्व
मुंबई : मुंबई पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलीस स्टेशनला न बोलावण्याचा मुंबई पोलिसांनी निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत घोषणा केली आहे. मात्र, कागदपत्र अपूर्ण असल्यास पोलीस ठाण्यात जावे लागणार आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. हीच पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्याची मागणी होत आहे. जर तुमची कागदपत्र अपुरी असतील किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीतच नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना नागरिकांच्या सोयीसाठी सरकार 2022-23 पासून ई-पासपोर्ट सुरू करेल, अशी घोषणा केली होती. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ई-पासपोर्ट सुरू करण्याच्या हालचालीमुळे एकूण नागरिकांचा याचा चांगला लाभ होईल, सुरक्षा वाढेल आणि सुरळीत आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ होईल.