The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : भारताच्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे पीएम किसान सन्मान सम्मेलन कार्यक्रम निमीत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार यांचे आभासी पध्दतीने किसान सम्मान सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन आज १७ ऑक्टोबर २०२२ रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमास उद्घाटक खासदार अशोक नेते होते. सदर कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर – गडचिरोली वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख संदिप एस. कन्हाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय तथा जिल्हा मृद परिक्षण, गडचिरोली प्रतिनिधी गणेश बादाळे, अविनाश पाल, दिशा सदस्य, चंद्रपूर तसेच कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली कर्मचारी उपस्थित होते व मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतकरी महिला उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईनव्दारे पी.एम. किसान अंतर्गत १२ व्या हप्त्याचे वितरण, दोन दिवसीय ऍग्री स्टार्ट अप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन, ३६०० जिल्हा पीएमोएसके (प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र) आऊटलेटचे उद्घाटन, भारत युरिया पिशव्यांचा शुभारंभ, वन नेशन वन फर्टीलायझर आणि आंतरराष्ट्रीय खत ई-मासिक ‘इंडियन एज’ लाँच डिजिटल लाँच कार्यक्रमाचे आयोजन आभासी पध्दतीने करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी ऑनलाईनव्दारे संबोधित करतांना सर्वप्रथम दोन दिवसीय ऍग्री स्टार्ट अप कॉन्क्लेव्ह मधील दालनाच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांकरिता नवीन तंत्रज्ञांना बद्दल पाहणी केली त्याचप्रमाणे पीएम किसान अंतर्गत १२ व्या हप्त्याचे वितरण केले, तसेच “भारत” या नावाने युरिया खताचा शुभारंभ केला व वन नेशन वन फर्टिलायजर अंतर्गत खताचा काळा बाजार बंद होईल व शेतकऱ्यांकरिता निम कोटेड युरिया व न्यानो युरिया चा शुभारंभ केला. तसेच प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी खते, बि-बियाणे, माती परीक्षण व सर्वच प्रकारचे उपकरणे मिळतील व अशा प्रकारे ३६०० पीएमओएसके चे उदघाटन केले आणि आंतरराष्ट्रीय खत ई-मासिक “इंडियन एज’ लाँच डिजिटल लाँच करण्यात आले.
खासदार अशोक नेते यांनी शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून कृषि क्षेत्र हा देशाच्या अर्थकारणाचा अविभाज्य घटक आहे व त्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्वांगीन विकासाकरिता केंद्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहे असे सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून पी एम किसान सम्मान निधी योजना शेतकऱ्यांना भविष्यात नक्कीच लाभदायक ठरेल असे सांगितले. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपला विकास साधावा असे प्रतिपादन केले.