The गडविश्व
पुणे : गूगल कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे. गूगलने सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी धावून येणार आहे.
सध्या अनेक आघाडीच्या परदेशी कंपन्या भारतात आकर्षित होत आहेत. मोठ्या कंपन्या भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता यात गूगलची (Google) यात भर पडली आहे.
गुगलच्या या योजनेद्वारे एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान (Google Cloud) तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करण्यात येणार आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पुण्यात गुगलचे कार्यालयाल सुरु होईल. Google Cloud सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करणार आहे. यामुळे ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा यासंबंधीचे ज्यांनी शिक्षण घेतले आहे त्यांना या नवीन कार्यालयात नोकरीची संधी मिळणार आहे.