– राजमुद्रा फाउंडेशनची निवेदनातून मागणी
The गडविश्व
एटापल्ली : तालुक्यातील पंदेवाही(म.) पुनागुडा येथील विज पुरवठा तिन ते चार महिन्यापासून खंडित आहे. तसेच सण २०१४ पासून विज मिटर साठी डिमांड भरून सुद्धा त्या नागरिकांना विज मिटर देण्यात आले नाही. ज्यांच्याकडे मिटर आहेत त्यांच्याकडे तिन ते चार महिन्यापासून विज पुरवठा खंडित आहे. याबाबत तेथील नागरिकांनी वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणाची दखल घेत राजमुद्रा फाउंडेशन तर्फे उपअभियंता महावितरण कंपनी लि. कार्यालय एटापल्ली येथे निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी येत्या दोन-तिन दिवसात विज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही दिली.
निवेदन देतांना राजमुद्रा फाउंडेशन अध्यक्ष अनिकेत मामीडवार, न.पं.एटापल्ली बांधकाम सभापती राघव सुलवावार, राजमुद्रा फाउंडेशन उपाध्यक्ष मनीष ढाली,पुनागुडा गावचे पाटील दिवाकर तलांडे, वासुदेव घोष, तिरुपती चापले, प्रसंजीत करमरकर, वाजीद शेख, संकेत पुल्लूरवार, आशिष बक्षी, दमण मेडीवार, अमित सोनी तसेच पुनागुडा गावातील नागरिक प्रभाकर मडावी, प्रकाश मडावी, ईश्वर सोयाम, सुरज सोयाम, चंद्रा तलांडे, बिचू तलांडे, रुपेश सोयाम, दौलत मडावी, सीताराम तलांडे, गजू इष्टम उपस्थित होते.