पुलावरून पाणी वाहत असतांना चारचाकी वाहन नेण्याचा पर्यंत जीवावर बेतला : वाहनासह ६ जण बुडाले

2160

– तिघांचे मृतदेह सापडले, उर्वरित तिघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू
The गडविश्व
नागपूर, १२ जुलै : जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नांदा पुलावरून पावसाचे पाणी वाहत असतांना वाहन नेण्याचा प्रयत्न जिवावर बेतला आहे. पुलावरून पाणी वाहत असतांना स्कॉर्पिओ नेतांना वाहन नदीत उलटल्यामुळे ६ जण वाहून गेल्याची घटना आज मंगळवार १२ जुलै रोजी घडली. यातील तिघांचे मृतदेह सापडली असून इतर तिघांचा शोध घेण्यात येत आहे. मुसळधार पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच प्रशासनाच्या वतीने सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहे व सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. असे असतांनाही काहीजण सुचनांकडे दुर्लक्ष करत आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदा पुलावरून पाणी वाहत असताना शुद्ध स्कॉर्पिओ वाहन चालकाने पुलावरून वाहन नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वाहनचालकाला रस्ता न दिसल्याने व पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने वाहन थेट नदीत बुडाले. यावेळी वाहनात ६ जण होते. या सर्वांचा शोध घेण्यासाठी प्रशासनातर्फे विविध पथके घटनास्थळी आणि आजू बाजूचा परिसरात रवाना करण्यात आले आहे, यापैकी ३ जणांचे मृतदेह सापडले. ते पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांच्या रेस्क्यू टीम तर्फे बेपत्ता ३ जणांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here