The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा येथील प्राणहिता नदीवर १२ वर्षानी पुष्कर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुष्कर कुंभमेळामध्ये जिल्ह्यासह इतर राज्यातील भाविक सुद्धा उपस्थित होत असतात. म्हणून सिरोंचा येथे कुंभमेळामध्ये भाविकांना जाण्याकरिता लालपरी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे बसेसची व्यवस्था करण्यात आली असून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पुष्कर मेळावा १२ वर्षांनी होत असल्याने अनेक भाविक भक्त याठिकाणी उपस्थित होत असतात. याकरिता जिल्हा प्रशासनाने सोयी सुविधा उपळभड करून दिल्या आहेत. गडचिरोली आगारातून गडचिरोली ते असरअल्ली २ बसेस असून बसस्थानकावरुन सकाळी १०.०० व ११.११ वाजता सुटेल. तसेच गडचिरोली ते अहेरी करीता ९ बसेसचे नियोजन करण्यात आले असून बसस्थानकावरुन ७.००, ८.१५, ८.४५, १०.१५, ११.४५, १२.३०, १३.३०, १५.३०, १७.०० तसेच अहेरी आगारतून अहेरी ते असरअल्ली करीता ०५ बसेसचे नियोजन करण्यात आले असून ६.००, ७.००, ८.००, १५.००, १६.०० वाजता या नियोजित वेळेत बस सुटणार आहेत. असे विभाग नियंत्रक रा.प गडचिरोली यांनी कळविले आहे.