पेंढरी परीसरात इंटरनेट सुविधेचा अभाव

318

– बीएसएनएल कवरेजचा लंपडाव
The गडविश्व
गडचिरोली / पेंढरी : धानोरा तालुक्यातील पेंढरी परीसरात बीएसएनएल व जीओ कंपनीचे टाॅवर उभारले आहेत. मात्र आद्यपही जीओचे टाॅवर सुरु करण्यास कंपनिला मुहूर्त सापडत नसल्याने हे टाॅवर शोभेची वस्तु बनली आहे. या परीसरात बीएसएनएल नेटर्वक उपलब्ध आहे मात्र कुणाशी संपर्क केल्यास वांरवार रिडायल करुन सुध्दा फोन लागत नाही. परिसरात कवरेजचा लंपडाव सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच परिसरात इंटरनेट सुविधेचा पूर्णतः अभाव असल्याने इंटरनेट सुविधेसाठी ग्राहक जीओकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. परंतु तीन वर्ष लोटुनही आद्यपही जीओची जोडणी झालेली नसल्याने पेंढरी परीसरात इंटनेटचा अभावही दिसत आहे. इंटरनेट सुविधेच्या अभावामुळे परिसरातील ग्राहक ऑंनलाईन गोस्टीबद्दल सुध्दा अनभिज्ञ आहेत. याचा परीणाम परीसरातील नागरीकांना होत आहे. आजचे युग हे डिजिटल युग आहे, सर्व खाजगी व शासकीय कार्यलयात कामे ऑंनलाईन झाले आहेत परंतु परीसरात इंटरनेट सुविधा नसल्यामुळे नागरिकांना थेट तालुका किंवा जिल्हा गाठावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावे लागत आहे. संबधित विभागाने लक्ष घालुन सेवा सुरळीत करण्याची मागणी परीसरातील नागरीकाकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here