– स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने शिबीराचे आयोजन
– महिलांनी घेतला पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला येथे शिवजयंती निमित्त काल १८ फेब्रुवारी रोजी स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. शिबीरात ३६ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. विशेष म्हणजे महिलांनीही यात पुढाकार घेतला.
स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीव्दारे जिल्हयातील अनेक ठिकाणी समिती नेमण्यात आल्या आहेत. समितीच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केल्या जाते. तसेच समितीच्या माध्यमातून गरजु व्यक्तींना रक्तपुरवठा केला जातो.
रक्तदान शिबीरात रवि सेलाटे, रितेश शिवरकर, जतीन फरांडे, रजत धोटे, पराग बांगरे, साहिल मुनघाटे, दिलीप जांभुळकर, सचिन म्हशाखेत्री, सुधीर भोयर, अमोल सेलोटे, शैलेश चापले, क्रिष्णा भोयर, दिपक चिचोलकर, लोकेश राऊत, प्रतिक भोयर, अमित उपासे, सुरज चापले, सुधीर चुधरी, सौरभ ठवरे, यशवंत मुरकुटे, निखील रोहणकर, शंतनु झोडगे, सुभाष लोळे, पंकज राऊत, दिलीप खारकर, राहुल डोर्लीकर, शुभम मलोडे, रवि देशमुख, मिथुन बानबले, गिरीधर उरकुडे, निवृत्ता राऊत, सविता कर्नेवार, पुनित उपासे, विकास लाडवे, उमाजी राऊत, रूपेश मुनघाटे या ३६ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
यावेळी डॉ. प्रणाली खोब्रागडे, अजय ठाकरे, समीरा खोब्रागडे, मयुर पोलोजवार, नन्हे तसेच समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.