The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल व बीओआय स्टार आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्रातील युवक-युवतींना फास्ट फुड प्रशिक्षण देवून त्यांना रोजगारासाठी आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली फास्ट फुड प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण आज काल शुक्रवार २२ जुलै रोजी पुर्ण झाल्याने प्रशिक्षणाचा समारोपिय कार्यक्रम नुकताच पार पाडण्यात आला.
सदर फास्ट फुड प्रशिक्षण १३ ते २२ जुलै २०२२ पर्यंत एकुण १० दिवसांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकुण ३० युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलामार्फत फास्ट फुडचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच नागपूरचे प्रसिध्द आचारी विष्णु मनोहर यांचे विष्णुजी की रसोई या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांची भेट घडवून विविध खाद्य पदार्थ बनविण्याविषयीची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना वेगवेगळे चायनिज पदार्थ बनविण्याबाबत माहिती देण्यात आली. फास्ट फुडचे प्रशिक्षण पुर्ण झाल्याने समारोपिय कार्यक्रमास प्रशिक्षण घेतलेले ३० उमेदवार हजर होते. या दरम्यान उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आम्ही आपल्या परिसरामध्ये फास्ट फुड व्यवसाय उभारून आपले जिवनमान उंचावण्यासाठी आत्मनिर्भर झाले आहोत. असे सांगितले तसेच उमेदवारांनी सदरचे प्रशिक्षणाची संधी गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आहे.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३०५, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट १०३, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२ असे एकुण २५५४ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५ मत्स्यपालन ६० कुक्कुटपालन ४५७, बदक पालन १५१, शेळीपालन ८०, शिवणकला १३७, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, भाजीपाला लागवड ५४०, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ७८०, टु व्हिलर दुरुस्ती ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण ३७०, एमएससीआयटी २०० असे एकुण २९८२ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., उपस्थित होते तसेच बीओआय-आरसेटीचे संचालक चेतन वैद्य सा., कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम सा., कार्यक्रम समन्वयक कुनघाडकर सा., फास्ट फुडच्या प्रशिक्षीका श्रीमती मेडपिलवार यांची उपस्थिती लाभली.
फास्ट फुड प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.