पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ब्युटीपार्लर व फोटोग्राफी प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ

153

The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑक्टोबर : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन गरजु युवक युवतींकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने १८ ऑक्टोबर २०२२ रोजी ब्युटीपार्लर व फोटोग्राफी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन बीओआय आरसेटी गडचिरोली येथे करण्यात आले.
या स्वयंरोजगार प्रशिक्षण निरोप समारंभ कार्यक्रमाकरीता बीओआय आरसेटी अंतर्गत ब्युटीपार्लर ३५, फोटोग्राफी ३५ प्रशिक्षणार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी ब्युटीपार्लर प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येकी १ नग ब्युटीपार्लर चेअर वाटप करण्यात आले व फोटोग्राफीचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या ईच्छुक उमेदवारांची मुलाखत घेवुन नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे तसेच यशस्वीरीत्या प्रशिक्षण पुर्ण केलेल्या सर्व ७० उमेदवारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.
आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ५१२, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३१४, ऑटोमोबाईल २७६, इलेक्ट्रीशिअन १६७, प्लंम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल डयुटी असिस्टंट ३१४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२, सेल्समॅन ४ असे एकुण २८६६ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन ( आत्मा ) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १४० मत्स्यपालन ८७ कुक्कुटपालन ५०४, बदक पालन १००, वराहपालन १०, शेळीपालन ८०, शिवणकला २२२, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड ५२५ पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ८८०, टु व्हिलर दुरुस्ती ६४, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३०, टु/ फोर व्हिलर प्रशिक्षण ५०२, एमएससीआयटी २००, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ३५५४ युवक – युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाकरीता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. बीओआय आरसेटीचे संचालक चेतन वैद्य, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, कार्यक्रम समन्वयक पुरुषोत्तम कुनघाडकर, महीला ट्रेनर संध्या कोतकोंडावार हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here