– ५ लाख रुपयांचे शासनातर्फे बक्षिस होते जाहीर
The गडविश्व
दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर काटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज गुरुवारी पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत ५ लाख रुपयांचे बक्षिस असलेला काटेकल्याण एरिया कमिटी सदस्य महंगू नामक नक्षली ठार झाल्याची माहिती आहे. दंतेवाडाचे एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मान्सून अंतर्गत पोलिसांनी शोधमोहीम वाढवली आहे. या अंतर्गत दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांतील सीमावर्ती भागात शोधमोहीम राबविण्याकरिता सीआरपीएफ आणि डीआरजीच्या जवानांना बाहेर काढण्यात आले. गुरुवारी दुपारी जवान मारजुम जंगलात पोहोचले यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एक नक्षली ठार झाला आहे. काटेकल्याण एरिया कमिटी सदस्य महंगू असे त्याचे नाव आहे. यावर ५ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. जवानांनी नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून. घटनास्थळी तीव्र शोधमोहीम राबविण्यात येत आहे अशी माहिती आहे.