– घटनास्थळावरून हत्यारांसह दैनंदिन साहित्य जप्त
The गडविश्व
नारायणपूर : छत्तीसगड मधिल नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत एका नक्षलीस कंठस्थान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे. घटनास्थळावरून शस्त्रे आणि इतर दैनंदिन साहित्य जप्त करण्यात आले आहे.
काल रविवारी रात्री उशिरा भारंडा पोलीस ठाण्यापासून तीन किमी अंतरावर डीआरजी जवानांची नक्षल्यांशी चकमक झाली. सांगितल्या जात आहे कि जंगलात आधीच घुसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. हि चकमक बराच वेळ सुरु होती. जवानांचा वाढत दबाव पाहता नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
चकमकीनंतर डीआरजी पथकाने आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबविली असता घटनास्थळावरून एका नक्षलीचा मृतदेह सापडला. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. जवानांनी नक्षलीच्या मृतदेहासह एक भारबार, एक कुकर बॉम्ब आणि दैनंदिन उपयोगी साहित्य जप्त केले आहे.