– शासनातर्फ़े त्याच्यावर ३ लाख रुपयांचे होते बक्षीस
The गडविश्व
बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील नायमेद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैका व मोसला जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत तीन लाख रुपयांचे बक्षिस असलेला नक्षली रितेश पूनेम ठार झाला आहे तर या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे.
आज पहाटेच्या सुमारास डीआरजी आणि सीआरपीएफ २२२ बटालियनच्या नायमेद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैका व मोसला जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत सेंड्रा LOS डिप्टी कमांडर डेप्युटी कमांडर रितेश पूनेम ठार झाला आहे. त्यावर शासनातर्फे ३ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर होते. तसेच या चकमकीत एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे.
चकमकीनंतर घटनास्थळी शोधमोहीम राबविली असता शस्त्रे, बॅगांसह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आणि दैनंदिन वापराचे वस्तू जप्त करण्यात आले आहे.
