– घटनस्थाळावरून शस्त्रे आणि स्फोटके साहित्य जप्त जप्त
The गडविश्व
बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील नायमेद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली यात २ महिला नक्षलींना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे. जवानांनी घटनास्थळावरून महिलानक्षलींच्या मृतदेहांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. तसेच परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे .
बिजापूर पोलिसांना दुर्डा डोंगरावर मोठ्या प्रमाणात गणवेशधारी सशस्त्र नक्षली असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे काल शनिवारी
सीआरपीएफ आणि डीआरजीची पथकामार्फत परिसरात संयुक्तरित्या शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान आज सकाळच्या सुमारास पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. जवानांचा वाढता दबाव पाहता नक्षली घनदाट जंगल आणि डोंगरांचा आधार घेऊन पसार झाले. चकमकीनंतर घटनास्थळी व परिसरात शॊधमोहीम राबविली असता दोन महिला नक्षलींचे मृतदेह, शस्त्रे आणि स्फोटके साहित्य आढळून आले. मृतक नक्षलींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून मृतदेहासोबत १२ बोअरच्या बंदुका, पिस्तूल, औषधे, नक्षल साहित्य, स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे.