The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. ०७ : तालुक्यातील पोलीस स्टेशन कोटगुल, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा आणि ग्रामसभा संघ कोटगुल यांच्या संयुक्त वतीने पोलीस स्टेशन कोटगुल येथे स्त्री हिसा विरोधी पंधरवडा अभियानच्या निमित्याने नकोचं पळवाट महिला हिंसामुक्तीसाठी एकजूट होऊया महिला सन्मानासाठी संवाद चर्चा सत्र कार्यकम घेण्यात आला.
सर्वप्रथम संविधान उद्देशिका यांचे वाचन करून शपथ घेण्यात आली. आंगी गावातील सर्व व्यक्ती आपल्या गावातील महिलांचे सन्मान करू, कोणत्याही परीस्थितीत महिलांवर हिसा करणार नाही आणि हिंसा होऊ देणार नाही या प्रमाणे संविधानाने दिलेल्या मानवीय हक्काचे पालन करू, उलंघन होऊ देऊ नका असे एकवाक्यता या कार्यक्रमात उपस्थित लोकांनी शपथ घेताना कबूल केले.
शुभदा देशमुख पुढे म्हणाल्या कि, महिलांवर आणि मुलीवर होणारे अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या जाणीव जागृती कार्यक्रमाची आवश्यता असते. आपण प्रत्येक गावात ग्रामसभेच्या पुढाकारातून गावचे नियमावली तयार करू शकतो. जात पंचयत व्यवस्था जी आहे त्यात महिलांचा सन्मान करण्यासाठी गावा मध्ये सर्वांनी मिळून महिला सुरक्षित धोरण तयार करावा. विशेषता युवकामध्ये महिला प्रती आदर आणि सन्मानाची भावना जागृत करावी लागेल. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कृष्णा सोळुंके प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन कोटगुल यांनी उपस्थित कोटगुल परीसरातील पोलीस पाटील, महिला सदस्य आणि इतर लोकांना सांगितले कि कायदा आणि सुव्यस्था टिकवून राहावे यासाठी आम्ही आहोत. परंतु गावातील होणारे हिंसा तुम्ही माणूस म्हणून थांबवू शकता. प्रत्येक महिला, मुलगी हिचा सन्मान करा. त्याना योग्य वागणूक दिली तर हिंसा होणार नाही. आपण हिंसा पासून हिंसा मुक्त गाव कसे करू शकतो याचा विचार करा असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंजुषा कुमरे, उद्घघाटक म्हणून मीराबाई दुधनाग, तसेच मार्गदर्शक म्हणून शुभदाताई देशमुख आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा, शैदुल टेकाम, इजामसाय काटेगे, कृष्णा सोळुंके प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन कोटगुल, गणेश येलमर, दुय्य्म प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन कोटगुल, दयानंद शिंदे पोलीस उप निरीक्षक पोलीस स्टेशन कोटगुल, राजेशजी नैताम सामजिक कार्यकर्ता कोटगुल,भारतसाय कुंजाम तंटा मुक्ती अध्यक्ष, मोहन कुर्चाम उपसरपंच पितेसुर यांच्या सह कोटगुल परिसारातील सर्व पोलीस पाटील, महिला बचत गट सदस्य आणि ३०० महिला पुरुष कार्यकमात उपस्थित होते. या दरम्यान कुमारीबाई जमकातन यांनी प्रास्ताविकेतून महिलांवरील अत्याचार, हिंसा संपविण्यासाठी देशात कायदेशीर आणि धोरणात्मक तरतुदी केल्या गेल्यात तरी त्यावरील कमजोर अंमलबजावणीआणि सामाजिक विषमतेचा प्रभाव यामुळे स्त्रियांवरील हिंसा अजुनही सुरूच आहे. त्यामुळे स्त्रियांवरील हिंसा संपविणे, महिला अधिकारांना संरक्षित करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी वातावरण निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रित येवून काम करण्याची गरज आहे असे सागितले. कार्यकर्माचे संचालन सुकलु यांनी केले तर आभार महेश लाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोटगुल परिसरातील सुकलु कोरेटी, सुखदेव तारांम, जागेश्वर करशी, जमुना डीलर आणि सर्व आम्ही आमच्या आरोग्यासाठी चे कार्यकर्त्यानी मेहनत घेतली. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन कोटगुल येथील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.