The गडविश्व
गडचिरोली, ३ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती १३६ पदाकरीता लेखी परिक्षा १९ जून २०२२ रोजी घेण्यात आली होती. आता या पोलीस भरतीच्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
यादी डाउनलोड करा
१२ जुलै २०२२ रोजी शारिरिक चाचणीकरीता पात्र १४३६ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्याआधारे ६ सप्टेंबर २०२२ ते ०८ सप्टेंबर २०२२ या तारखेला गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ मधील शारिरिक चाचणीकरीता पात्र उमेदवारांची मैदाणी चाचणी घेण्यात आली.
त्यावेळी उमेदवारांचे शैक्षणीक कागदपत्रे, एनसीसी कागदपत्रे व इतर कागदपत्राची तपासणी तसेच शारिरिक मोजमाप करण्यात आले होते. त्याआधारे मैदानी चाचणी मध्ये सहभागी झालेल्या उमेदवाराचे गुण १५ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते.
सदरची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी ही लेखी चाचणी ( पेपर क्रमांक १) व मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकुण गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. याकरीता साप्रवि शा.नि.क. एसआरव्ही १०१२/प्र.क.१६/१२/१८-अ दि. १७ ऑगस्ट २०१४ व साप्रवि शासन शुध्दीपत्रक क्रमांक सकिर्ण-१११८/प्र.क ३९/ १६-अ दि.१९ डिसेंबर २०१८ तसेच गृह विभाग शा.नि.क्र. पोलीस-१८१९/प्र.क. १३१६/ पोल ५ अ दि.१० डिसेंबर २०२० या शासन निर्णयाच्या आधारावर काढण्यात आलेली आहे.
गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती – 2022 उमेदवारांची प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळ https://t.co/ta1gKnybG4 यावर प्रसिद्ध केली आहे
— GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) October 3, 2022
सदरची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी ही उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे https://www.gadchirolipolice.gov.in/Recruitment या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
२२ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस भरती – २०२२ ची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती. २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड / प्रतिक्षा यादीवर आक्षेप घेण्यासाठी संधी देण्यात आली होती. त्यावर आक्षेप प्राप्त झाल्याने आक्षेपाची पडताळणी करण्यात आली होती.
आज ३ ऑक्टोबर २०२२ रोजी उमेदवारांने घेतलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने अंतिम / प्रतिक्षा यादीत किरकोळ बदल झाल्याने बदल करून अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत असुन यादीतील उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे निवड करण्यात आलेली आहे. मुळ कागदपत्रे पडताळणी मध्ये काही आक्षेपार्ह किंवा खोटे कागदपत्र मिळुन आल्यास उमेदवाराची निवड रद्य करण्यात येईल. प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम यादीतील उमेदवार हे पात्र आहेत असे समजुन नियुक्ती देण्यात येणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे.