- – ३ तासापासून वाहतूक ठप्प
– सार्वजनिक बांधकाम विभाग व सिंचाई विभागाच्या दिरंगाई चा फटका
The गडविश्व
सावली, १६ जुलै : तालुक्यातील हरांबा, लोंढोली,जिबगाव, साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी डांबरीकरण उखळले आहे. या मार्गावरील मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत. आज दुपारच्या सुमारास सावली-हरंबा रस्त्यावर ट्रक फसला त्यामुळे ३ तास वाहतूक ठप्प होती.
हरांबा, लोंढोली,जिबगाव, साखरी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने मोठ्या खड्यात नेमका पाणी किती आहे हे लक्षात येत नाही व हेच खडे अपघातास कारणीभूत ठरतात असतात. जिबगांव हरांबा परीसरातील नागरिकांची तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पंचायत समिती, महाविद्यालय, शाळा, दवाखाना, बाजार पेठ करीता दररोज ये-जा असते. तसेच रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनाची रेलचेल सुरू असते. त्यामुळे रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य झाले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उखडले असून दोन ते तीन फुटाचे पसरट खड्डे पडले आहेत तर गोसेखुर्द अंतर्गत पाईप लाईन चे काम हे थातूर मातूर केल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. या मार्गावरून गोसे विभागाने पाईप टाकली त्यात दगड, चुरी भरून सुव्यवस्थित करणे आवश्यक होते मात्र त्यात माती टाकून बुजविल्याने पावसाच्या पाण्याने ती माती खाली गेली व वाहने फसायला सुरुवात झाली आहे. आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एक ट्रक फसल्याने सावली-हरांबा मार्गावरील वाहतूक ही ३ तासापासून ठप्प आहे. वाहन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र या निमित्याने त्यांचा गैरप्रकार समोर आलेला आहे.
अनेक वाहन फसत असल्याने गोसेविभाग व बांधकाम विभागाना विचारणा केली असता उडवा उडविचे उत्तर देत दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर मोठे खड्डे पडले असून वाहन चालकास वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याची एवढी दुरवस्था झाली असून सावली बांधकाम विभागाचे अक्षम्य दुलर्क्ष होताना दिसत आहे असा आरोप वाहन धारकांकडून केला जात आहे .
एकीकडे पालकमंत्री भुमीपुजन केल्याचे बोर्ड तर दुसरी कडे निधी नसल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या कडुन सांगण्यात येत आहे. निधी अभावी सावली- हरांबा रोडचे काम थांबले असल्याचे सांगितले असल्यामुळे अनेक पश्न निर्माण होत आहेत. तरी वेळीच लक्ष देउन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.