– १५ नोव्हेंबर पर्यंत करता येणार नोंदणी
The गडविश्व
गडचिरोली, ७ नोव्हेंबर : फिट इंडिया मोहिमे अंतर्गत शालेय जिवनात विद्यार्थांमध्ये विविध खेळ व शारीरिक फिटनेस याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय खेल प्राधिकरण, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय यांचे मार्फत फिट इंडिया मोहिमे अंतर्गत प्रश्न मंजुषा आयोजीत करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे २८ ऑगस्ट २०२२ रोजी अनावरन झाले असून शाळा व विद्यार्थी यांचे नोंदणी करण्यासाठी ३ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत करावयाचे आहे. एका शाळेतून किमान २ विद्यार्थ्यांची नोंदणी करणे अनिवार्य असून जास्तीत जास्त कितीही विद्यार्थांची नोंदणी करु शकता. सदर प्रश्न मंजुशा राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार असून सुमारे ३.२५ कोटी चे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
प्रश्नमंजुशा नोंदणी https://fitindia.nta.ac.in/ या साईटवर सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे व शाळेंचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे, सदर प्रश्नमंजुशेमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सहभाग वाढविण्याकरीता संबंधीत शाळेतील मुख्याध्यापक / क्रीडा शिक्षक / क्रीडा विषयक प्रभारी यांनी प्रयत्न करुन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी केलेले आहे.