The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत पथनाट्य चे सादरीकरण करण्यात आले.
प्रस्तुत पथनाट्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत ग्रामीण व शहरी भागात आयोजित करून त्याद्वारे जनतेचे प्रबोधन करण्यात आले. प्रस्तुत पथनाट्य “चवदार तळे सत्याग्रह” आणि “अंधश्रद्धा निर्मूलन” यावर आधारित सादर करण्यात आले असुन त्यात मुख्य भूमिका प्रा. दीपक तायडे यांनी पार पाडली. तर प्रा. प्रज्ञा वनमाळी आणि प्रा. हितेश चरडे यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी कार्यक्रमात ग्रामीण व शहरी भागातील जनता, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रंथालय विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.