The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली यांच्या सांस्कृतीक विभागद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण व पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका कु. प्रज्ञा वनमाळी तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विवेक गोर्लावार, प्रा. डॉ. किशोर कुडे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांचे सामाजिक कार्य यावर मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. वर्षा तिडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेश पोहणे यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रंथालय विभागातील कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.