The गडविश्व
मुंबई : बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या शिक्षक मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत आहे. परंतू तरीही मुंबईत बारावीचा रसायन शास्त्राचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. व्हॉट्सॲप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आली आहे. तर पेपर व्हायरल करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनीचीही चौकशी करण्यात आली आहे.
या पेपरफुटीच्या प्रकरणात एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेच्या आधी या शिक्षकाने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर पाठवली होती.
A tuition teacher, Mukesh Singh Yadav arrested by Vile Parle Police in connection with Class 12th Chemistry Question Paper leak. Probe reveals that he ran pvt coaching classes in Malad & leaked the question paper on a WhatsApp group before exams: Mumbai Police#Maharashtra
— ANI (@ANI) March 14, 2022