– चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षणाच्या वतीने मुलीच्या पालकांचे केले समुपदेशन
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्हयात एका गावात बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन चंद्रपूर व जिल्हा बाल संरक्षण यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अधारे चाईल्ड लाईन पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर व पोलीस स्टेशन दुर्गापर यांच्या सोबतीने 16 मार्च रोजी विवाहस्थळ गाठून होणार बालविवाह थांबविला. यादरम्यान बालिकेच्या परिवाराला व वर पक्षाच्या परिवाराला बालविवाह न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.
बालीका ही यवतमाळ जिल्हयातील असून तिचा विवाह चंद्रपूर तालुक्यात होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन यवतमाळ ने चाईल्ड लाईन चंद्रपूर आणि बाल संरक्षण कक्ष यांना दिली. चाईल्ड लाईन चंद्रपूरच्या संचालिका नंदाताई अल्लूरवार आणि सरचिटणिस प्रभावती मुठाळ यांच्या मार्गदर्शनाने माहिती मिळताच कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली व 16 मार्च रोजी सकाळीच चाईल्ड लाईन पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर व पोलीस स्टेशन दुर्गापर यांच्या सोबतिने विवाहस्थळ गाठले. त्यानंतर बालीकेच्या परिवाराला व वर पक्षाच्या परिवाराला बालविवाह न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच मुलीला व मुलीच्या पालकांना बाल कल्याण समिती चंद्रपूर येथे उपस्थित राहण्यास सांगितले.
यावेळी दुर्गापुर पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रवीण लाकडे , पोलिस हवालदार अशोक मंजुळकर, ना.पो. शी सूरज खाडे, महिला ना. पो. शी रंजना माडवकर, कर्मचारी, चाईल्ड लाईन चंद्रपूर समन्वयक अभिषेक मोहूर्ले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, सामाजिक कार्यकर्ती प्रतिभा मडावी, टिम मेंबर रेखा घोगरे, नक्षत्रा मुठाळ, समुपदेशिका दीपाली मसराम, तसेच गावच्या पोलिस पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती आणि आशा कार्यकर्ती उपस्थित होते. सदर केसमध्ये चाईल्ड लाइन टिम मेंबर चित्रा चौबे, कल्पना फुलझेले, प्रदीप वैरागडे, प्रणाली इंदूरकर आदींनी सहकार्य केले.
चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेले बालविवाह संदर्भात माहिती तसेच काळजी व संरक्षण गरज असणारे ० ते १८ वयोगटातील बालकांना मदत करण्याकरिता “१०९८” चाइल्ड लाईनच्या या टोल फ्री नंबरवर संपर्क करावे, बाल विवाह संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णता गुपित ठेवण्यात येते असे आवाहन चॉद लाईन चंद्रपूर टिमच्या वतीने करण्यात आले आहे.