– जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली आणि लायन्स क्लब गडचिरोली यांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, २३ ऑक्टोबर : मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे सन साजरे करता आले नाहीत. त्यामुळे यावर्षी संपूर्ण राज्यात दिनांक २१ ऑक्टोंबर २०२२ पासून दीपावली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. या दीपावलीचा आनंद सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच महिला व बाल विकास विभागाच्या कार्यरत संस्थांमधील महिला व बालके यांना देखील घेता यावा याकरिता लायन्स क्लब गडचिरोली यांच्या सहकार्याने आज दिनांक
२२ ऑक्टोबर २०२२ ला जिल्हा महिला व बालविकास कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने आयोजित लोकमंगल अहिल्यादेवी बालसदन घोट येथे एक दिवसीय दिपावली सन बालकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संस्थेमध्ये सदर कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मंत्री महोदय महिला व बाल विकास विभाग यांच्या व आयुक्त,महिला व बाल विकास यांचे निर्देशानुसार व मा.जिल्हाधिकारी,गडचिरोली यांच्या आदेशान्वये जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनात, तसेच लायन्स क्लब गडचिरोली व गडचिरोली शहरातील प्रसिद्ध व्यापारी प्रफुल सारडा यांच्या सहकार्याने आयोजन करून संस्थेतील बालकांना दिवाळी निमित्त, नवीन कपडे, फराळ साहित्य, तसेच स्वाधार गृह घोट येथील महिलांना साड्या व फराळ साहित्य वाटप करण्यात आले. सदर बालकांना व महिलांना एक दिवसीय दीपावली सन बाल कल्याण समिती, बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी, तसेच लायन्स क्लब गडचिरोलीचे पदाधिकारी आणि संस्थेतील कर्मचारी यांनी सदर कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करण्यात आले व एक दिवसीय दिपावली सण साजरा करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला उपस्थीत लायन्स क्लब गडचिरोलीचे अध्यक्षा डॉ. सविता गोविंदवार, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वर्षा मनवर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, सदस्य दिनेश बोरकुटे, बालसदन घोटचे अधिक्षका निर्मला मॅडम, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी कवेश्वर लेणगुरे, प्रियंका आसुटकर, जयंत जथाडे, उज्वला नाखाडे, पूजा धमाले, रवींद्र बंडावार, निलेश देशमुख, उपस्थित होते.