– अनेक वन्यप्राण्यांचे झाले दर्शन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून नजीक असलेल्या गुरवळा नेचर सफारी येथे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पर्यटकांसाठी मचाणवर निसर्ग अनुभव व प्राणी निरीक्षणाचे आयोजन गडचिरोली वनविभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पाणवठ्यावर मचानीत बसून प्राणी निरीक्षणाचा आनंद २० पर्यटकांनी घेतला.
यावेळी रात्री च्या प्रकाशात पर्यटकांना बिबट, अस्वल, राणकुत्रे, रानडुक्कर, चितळ, नीलगाय, चौसिंगा, कोल्हा , ससा आदी. प्राण्यांचे दर्शन झाले. प्राणी निरीक्षणाचा अनुभव रोमांचकारी असल्याचे पर्यटकांनी व्यक्त केले.या रोमांचक क्षण प्राणी निरीक्षणाचा अनुभव डॉ. रविंद्र चौधरी, मिना रविद्र चौधरी, देवेद्र कामडी,सूचिता देवेंद्र कामडी, प्रमेश उराडे, ब्रिजेश नागदेवते, वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर, चेतन शेंडे, महेश वाला, किशोर खेवले, होमदेव कोसमशिले, योगेश हजारे, होमदेव कुरवटकर यांनी मनसोक्त आनंद घेतला असून समाधान व्यक्त केले आहे.
गुरवळा नेचर सफारी मध्ये प्राणी निरीक्षणाचा कार्यक्रम गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उप वनसरंक्षक मिलिश शर्मा व जमीर शेख (भा व से) यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.पडवे ( प्रादे.), संरक्षण व अतिक्रमण निमूर्लन वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कोडापे, गुरवळाचे क्षेत्रसहाय्यक एम.के.सिडाम, गुरवळाचे वनरक्षक गुरु वाढई तसेच गुरवळा नेचर सफारी येथील संपुर्ण गाईड यांनी सहकार्य केले.