The गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील बेलगावघाट येथील गणेशपूर मार्गावर असलेल्या एका झोपडीतून २ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केल्याची कारवाई शनिवारी बेडगाव पोलिस, मुक्तिपथ व गाव संघटनेने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी महेंद्र रामनाथ सहारे ( ३०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका झोपडतीतून अवैधरित्या देशी, विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच, पोलिस, मुक्तिपथ व गाव संघटनेने संयुक्तरित्या झोपडीची तपासणी केली. यावेळी पलंगाखाली ठेवलेली २ हजार ३९ रुपयांची देशी-विदेशी दारू व सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण माल जप्त करून दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नितीश पोटे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने केली. यावेळी गावसंघटनेचे सदस्य बेडगावचे सरपंच चेतानंद किरसान, तालुका संघटक निळा किन्नाके उपस्थित होते.