ब्रम्हपुरी : कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

2013

– अपघातात आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती
The गडविश्व
गडचिरोली : ब्रम्हपुरी तालुक्यातील रनमोचन फाट्यानजीक आज सकाळच्या सुमारास कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरच्या इंजिनचे दोन तुकडे झाले व कार रस्त्याशेजारील शेतात घूसली. सदर कार ही चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांची असल्याची माहिती कळते. कारमध्ये सभापती अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार होते. या अपघातात आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ब्रम्हपूरी येथे उपचार सरू असल्याची माहीती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here