– युवामंच आणि ग्रामपंचायतीच्या वतीने “एक पुस्तक गावासाठी” उपक्रम सुरू
The गडविश्व
चिमूर : एक दिवसाचा सरपंच या प्रशंसनीय व परिवर्तनशील उपक्रमाचे शिलेदार असलेल्या चिमूर तालुक्यातील आंबोली या गावात युवामंच आणि ग्रामपंचायतीच्या वतीने “एक पुस्तक गावासाठी” हा उपक्रम सुरू आहे.
या उपक्रमासाठी मदत म्हणून ब्राईटएज फाउंडेशन परिवाराच्या वतीने वाचनालयाला शेती आणि कायदेविषयक पुस्तके भेट म्हणून सहकोषाध्यक्ष ईश्वर हजारे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचा शालिनीताई दोहतरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव ठाकरे, सदस्य शुभम मंडपे, फाउंडेशनचे शैक्षणिक प्रमुख विवेक चौखे, अध्यक्ष श्रीकांत एकुडे, युवा मंचाचे सदस्य आशिष चौधरी आणि वाकडे उपस्थित होते.