– शेतशिवारात करंट लागून झाला होता मृत्यू
The गडविश्व
भंडारा : जिल्ह्यातील कोका अभयारण्य लगत असलेल्या शेत शिवारा नजीक शुक्रवारी रुद्रा वाघाचा मृतदेह आढळून आला होता. रुद्राचा मृत्यू शेतशिवारात लावलेल्या विद्युत करंट मुळे झाला होता. या प्रकानाचा फास अधिकच घट्ट होत चालला असून याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
दिलीप नारायण नारनवरे (५५), राजू नारायण नारनवरे (५०), सुभाष झिटू चाचेरे (७०), चैतराम गोदरू चाचेरे (३६) व विलास कुसन कागदे (५०) सर्व रा. चांदोरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपितांची नावे आहेत.
शुक्रवारी रुद्रा चा मृत्यू झाला यावेळी चांदोरी (मालिपार) येथील दिलीप नारनवरे यांची चौकशी केली असता त्याने वन्यप्राण्यांच्या शिकरीसाठी लावलेल्या विद्युत तारामुळे झाला व हे फासे आपणच लावल्याचे वनविभागापुढे कबूल केले. या प्रकरणी नारनवरे याला अटक केली व त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात आला. दरम्यान काल चौघांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे आता अटक करण्यात आलेल्या आरोपीतांची संख्या पाच झाली आहे.
वाघाचा मृत्यू हा वीजप्रवाहित तारांच्या स्पर्शाने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातही स्पष्ट झाले होते. विविध पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध यावेळी वन विभागाने माहिती देणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले होते. याप्रकरणी वनविभागाने तारांचे बंडल आणि लाकडी खुंट्या जप्त केल्या आहेत.