THE गडविश्व
भद्रावती : तालुक्यातील चालबर्डी ( कोंढा) शेत शिवारात काल पहाटेच्या सुमारात पट्टेदार वाघीणीचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली. सदर वाघीण दोन दिवसा पूर्वी मृत पावली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर घटनेची माहीती स्थानिक वनविभागाला प्राप्त होताच अधिकारी व त्यांच्या पथकांनी घटना स्थळ गाठले. वरिष्ठ अधिकारी सुध्दा घटना स्थळी दाखल झाले. ही वाघीण सुमारे चार वर्षाची असावी. शवविच्छेदना नंतर या वाघीणीला अग्नी देण्यात आली. वाघीणीचा मृत्यु विद्युत तारेचा शॉक लागुन झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे.