भला मोठा वाघ : ढाण्या वाघ !

397

भारताचा राष्ट्रीय प्राणी- वाघ घोषित दिवस

 

भारतात वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे. एके काळी पश्चिमेस पूर्व अँटोलिया प्रदेशापासून अमूर नदीपात्रात आणि दक्षिणेस हिमालयाच्या पायथ्यापासून सुली बेटांच्या बालीपर्यंत सर्वत्र पसरले होते. २० व्या शतकाच्या सुरुवातीस वाघसंख्या कमीतकमी ९३ टक्के होते. सद्या ऐतिहासिक श्रेणी गमावली आहे, पश्चिम व मध्य आशियात, जावा व बाली बेटांमधून, आग्नेय, दक्षिण आशिया आणि चीनच्या मोठ्या भागात उधळली गेली आहे. आजची वाघश्रेणी खंडित आहे, भारतीय उपखंड आणि सुमात्रावरील सायबेरियन समशितोष्ण जंगलांपासून ते उप-उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. सन १९८६पासून त्याला आययूसीएन रेड लिस्टमध्ये- धोक्यात घातलेले म्हणून सूचीबद्ध केले आहे. सन २०१५पर्यंत जगातील वाघांची संख्या ३०६२ असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. २०व्या शतकाच्या सुरुवातीला जवळजवळ दहा लाख इतकी संख्या असून उर्वरित बहुतेक वाघसंख्या एकमेकांपासून वेगळी होऊ लागली. ती घटण्याच्या मुख्य कारणांमध्ये निवासस्थान नष्ट करणे, निवासस्थान खंडित करणे आणि शिकार करणे समाविष्ट आहे.
जो वाघ माणसांना आपले नेहमीच भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. अशा वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फक्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्न बऱ्याच काळापासून सतावत आहे. तेथील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खाऱ्या पाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत, असा अंदाज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तरांचल राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर जिम कोर्बेट यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. सन १९४०च्या दशकात पुण्याजवळील भीमाशंकरच्या जंगलात शंभरच्या वर माणसे एका वाघाने मारली होती. तो नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधताना येणारे अपयश किंवा काही पूर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचलमध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती, असे आयते भक्ष्य खाण्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत, असा अंदाज होता.
वाघ हा मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. या कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून त्याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान तो भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरून आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो, तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटरपर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किग्रॉपर्यंत असते. हा अपवाद झाला, परंतु १९०-२०० सेमीपर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किग्रॉपर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किग्रॅापर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील अजूनच लहान असतो. व त्यांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फर असते. प्रत्येकाच्या अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात. यावरून त्यांना ओळखता येते. त्याच्या अंगावर साधारणपणे शंभरपर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग त्याला दाट झाडींमध्ये अदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येकाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. त्यांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. पंजा हा त्याच्या आकाराच्या मानाने खुप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फिरताना जरी दिसला नाही तरी त्याचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी त्यांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली फिरतो. जबड्याची ताकद भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतो. त्याची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ते पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते. या बाबतीत मांजरांपेक्षा त्याची वेगळी सवय आहे. त्यांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तास न् तास डुंबून स्वतःला थंड ठेवतात.
भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आहे. त्याची शिकार हे शौर्याचे प्रतीक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे, मानाचे लक्षण होते. त्याच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. त्याच्या शिकारीसाठी मोठमोठे हाकारे दिले जायचे. त्याला चहूबाजूने वेढा देऊन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामील होत. तसेच बरेच हत्ती, घोडे असा ताफ्यांचा समावेश असे. त्यामुळे त्याची शिकार ही फक्त राजेलोकांपुरती मर्यादित होती. भारताच्या ब्रिटिश राजवटीत त्याच्या शिकारीत आमूलाग्र बदल झाला. बंदुकिसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दुरूनही सावज टिपता येऊ लागले व त्याचा वाईटकाळ सुरू झाला. ब्रिटिश काळात खास त्याच्या शिकारीसाठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक महान शिकारी या काळात उदयास आले. त्याची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर मचाणवर बसून करत अथवा हाकारे देऊन साधत. त्याची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला- इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे. अनेक शिकाऱ्यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते, अशी कबुली देतात. त्यांच्या नैसर्गिक वसतिस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, उद्योगीकरण, रस्ते, धरणे, गावे वसली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी त्यांचे पाळीव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातो; म्हणून तो नको, असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटिशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. त्याच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर या वाघद्वेष्ट्यांनी त्याने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून त्याच्या शिकारीचा सपाटा लावला होता. २०व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते, असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी होते व आहेतही. ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघमित्र बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकासाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे, हीसुद्धा समाधानाची बाब आहे. तरीही अधूनमधून संजय दत्त, सलमान खान यांसारखी प्रकरणे बाहेर येत असतात. म्हणून त्यास वाचविण्यासाठी दि.९ जुलै १९६९ रोजी भारत सरकारने त्यास राष्ट्रीय प्राणी घोषित करून शिकारीला प्रतिबंध घातला. वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात. त्याचा अर्थ त्यांच्यापेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात, मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे होय. तो नसेल तर या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल. त्याने निसर्गचक्र बिघडून जाईल. तो जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघोबा असलेल्या जंगलात साधे लाकूडतोडे व जंगलावर अवलंबून असणारे लोक भीतीपोटी जात नाहीत आणि जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत.
!! गडविश्व परिवारातर्फे वाघोबा दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

– संकलक –
श्री. एन. के. कुमार, से.नि.अध्यापक.
(भारतीय थोरपुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासक)
गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here