– विविध कार्यक्रमांचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवाणीताई दाणी वखरे व पुर्व विदर्भ समन्वयक वामनजी तुर्कै उद्या १२ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या या दौऱ्याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा प्रभारी प्रदेश सचिव अनिल डोंगरे, सहप्रभारी प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, युवा वारिअर्स संयोजक देवदत्त देहणकर, आत्मनिर्भर संयोजक सारंग कदम, भाजयुमो गडचिरोली जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
याप्रसंगी शिवाणीताई दाणी वखरे यांच्या हस्ते उद्या भाजयुमोचा संघटनात्मक आढावा, युवा वारिअर्स शाखेचे अनावरण, बैठकीत आगामी कार्यक्रम व विविध विषयावर चर्चा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्हा दौऱ्या दरम्यान मंडलातील सर्व भाजयुमो जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. सर्व भाजयुमो तालुका अध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील नगर पंचायत नगरपरिषद व पंचायत समिती क्षेत्र निहाय केलेले १८ ते २५ वयोगटातील युवा वारिअर्सचे यादी तसेच तालुका कार्यकारणीची पुर्ण नाव मोबाईल पत्ता व पद ई मेल अशा पुर्ण माहिती सह यादी आणण्यात यावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, जिल्हा महामंत्री भारत बावनथडे,जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, जिल्हा महामंत्री
अमोल गुड्डेल्लीवार, जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, विद्यार्थी विभाग संयोजक आशिष कोडाप, आत्मनिर्भर भारत संयोजक शंभु गेडाम, युवती विभाग संयोजक प्रिती शंभरकर, जिल्हा महामंञी अनिल तिळके तसेच सर्व भाजयुमो तालुका अध्यक्ष जिल्ह्यातुन तालुक्याला दिलेले जिल्हा पदाधिकारी व सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दौरा पुढीलप्रमाणे-
सकाळी १० वाजता अहेरी आगमन, सकाळी ११ वाजता अहेरी युवा वारिअर्स शाखेचे अनावरण, ११.३० वाजता अहेरी विधानसभा भाजयुमो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बैठक,
दुपारी ३ वाजता चामोर्शी तालुका युवा वारिअर्स शाखेचे अनावरण, दुपारी ४.३० वाजता गडचिरोली शहर युवा वारिअर्स शाखेचे अनावरण, ४.४५ वाजता गडचिरोली विधानसभा भाजयुमो पदाधिकारी कार्यकर्ते बैठक, ५.३० वाजता आरमोरी तालुका युवा वारिअर्स शाखा अनावरण,
६.३० वाजता कुरखेडा तालुका युवा वारिअर्स शाखेचे अनावरण,
कुरखेडा कोरची तालुका भाजयुमो पदाधिकारी बैठक,
७.३० वाजता विसोरा तालुका वडसा येथे युवा वारिअर्स शाखेचे अनावरण